बातम्या
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा : शेकापचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Administrator - 11/4/2025 3:57:05 PM
Share This News:
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा : शेकापचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कर्जमाफी, एफआरपी, वीजबिल माफीसह सहा प्रमुख मागण्या
कोल्हापूर, दि. ११ (प्रतिनिधी) – भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना, राज्य शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या मागण्यांची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या निवेदनात मुख्यतः सहा प्रमुख मुद्दे मांडण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने लागू करावी, अशी मागणी केली आहे. तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणारा हमीभाव मिळावा, असेही नमूद करण्यात आले.
शेतीमालाच्या आधारभूत किंमती शेतीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर नव्याने निश्चित करून, बाजारात भाव न मिळाल्यास शासनाने थेट खरेदी करावी, अशी मागणी आहे. तसेच पाणी, वीज, खते, औषधे यांचे दर स्थिर ठेवावेत, अशी भूमिका पक्षाने मांडली.
एप्रिल २०२४ पासून १ ते ७.५ एच.पी. पर्यंतच्या शेतीपंपांना मंजूर केलेली मोफत वीज योजना तत्काळ अंमलात आणावी, व ७.५ एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपधारकांना वीजबिल माफी लागू करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा : शेकापचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
|