बातम्या

विवेकानंद  कॉलेजमध्ये  वाचन  प्रेरणा  दिन  संपन्न

Reading Inspiration Day


By nisha patil - 10/15/2026 3:46:25 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजमध्ये  वाचन  प्रेरणा  दिन  संपन्न

कोल्हापूर, दि. 15 : ग्रंथालय विभाग, मराठी विभाग आणि एन. सी. सी. विभाग यांच्या वतीने विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला . यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन, ग्रंथवाचन आणि वंदे मातरम गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त 'समग्र वंदे मातरम' पुस्तकातील  मजकुराचे वाचन करण्यात आले.

       याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर यांनी 'वाचन संस्कृती' या विषयावर बोलताना वाचनामुळे ज्ञान समृद्धी आणि अनुभव समृद्धी वाढते, भारतीय ज्ञान परंपरेतील आपली ग्रंथसंपदा  त्याचप्रमाणे आधुनिक काळातील लेखकांचे साहित्य  वाचन आणि लेखनासाठी प्रेरणादायी कसे आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयापर्यंत जाणे किती महत्त्वाचे आहे. याविषयी  सांगितले.

          कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले.  आभार सहाय्यक ग्रंथपाल श्री हितेंद्र साळुंखे यांनी मानले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. सी. बी. पाटील,  एनसीसी प्रमुख डॉ. नम्रता नरेवाडीकर, प्राध्यापक वर्ग, ग्रंथालयातील शिक्षकेतर  कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


विवेकानंद  कॉलेजमध्ये  वाचन  प्रेरणा  दिन  संपन्न
Total Views: 14