बातम्या

आजरा महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभागात वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा

Reading Inspiration Daycelebrated


By nisha patil - 10/15/2026 11:18:54 PM
Share This News:



आजरा महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभागात वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा

आजरा(हसन तकीलदार): आजरा महाविद्यालय, आजरा येथील व्होकेशनल विभागाच्या वतीने वाचन प्रेरणादिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मनोजकुमार पाटील उपस्थित होते. यावेळी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, वाचनाच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर माणसामध्ये जग जिंकण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. वाचन हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून विचारांना दिशा देणारे, व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून आपले ज्ञान, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात व्होकेशनल विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचे महत्त्व जाणून घेतले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी प्रेम निर्माण होण्यासोबतच त्यांची भाषिक कौशल्ये, आकलनशक्ती आणि वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होते.

या कार्यक्रमासाठी प्रा. नेहा पेडणेकर, प्रा. सुषमा पारकर, प्रा. तेजस्विनी जाधव, प्रा. नार्वेकर मॅडम आणि प्रा. गिरीश कुरुणकर उपस्थित होते. उपस्थित प्राध्यापकांनीही वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्वाचे स्थान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक संदीप देसाई यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीमुळे वाचन प्रेरणादिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार आणि विचारातून प्रगती हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांना ज्ञानसमृद्ध आणि सक्षम बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.


आजरा महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभागात वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा
Total Views: 5