बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट
By nisha patil - 8/18/2025 2:47:11 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट
हवामान खात्याचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर : भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या व निचांकी भागातील लोकांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट
|