बातम्या

रील मेकर्सना पत्रकारांसारखे संरक्षण नाही! दिल्ली पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका

Reel makers do not have the same protection


By nisha patil - 11/18/2026 3:06:25 PM
Share This News:



रील मेकर्सना पत्रकारांसारखे संरक्षण नाही! दिल्ली पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका

 

सोशल मीडियावर रील बनवणारे आणि इन्फ्लुएन्सर्स यांना पत्रकारांप्रमाणे विशेष संरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. निदर्शनांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात दाखल याचिकेवर पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करत ही भूमिका स्पष्ट केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निदर्शनांदरम्यान पत्रकारांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप विविध पत्रकार संघटनांनी याचिकेद्वारे केला आहे. यावर उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आंदोलनस्थळी काही व्यक्ती कॅमेरे आणि मायक्रोफोन घेऊन यूट्यूब रील तयार करत होत्या. त्यामुळे खरा पत्रकार आणि रील मेकर यांच्यात फरक ओळखणे पोलिसांसाठी कठीण झाले होते.

पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना या व्यावसायिक पत्रकारांसाठी आहेत. मात्र, नागरिकांच्या माहिती प्रसारित करण्याच्या किंवा वार्तांकन करण्याच्या अधिकारावर कोणतेही बंधन नाही. केवळ पीआयबी अधिस्वीकृती किंवा अधिकृत ओळखपत्र नसल्यामुळे पत्रकारांना रोखले जात नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. पत्रकारांना जाणीवपूर्वक वार्तांकनापासून रोखल्याचा आरोप फेटाळताना, ओळख पटवण्यात गोंधळ झाल्यास कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांना तातडीने सोडण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.


रील मेकर्सना पत्रकारांसारखे संरक्षण नाही! दिल्ली पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका
Total Views: 12