विशेष बातम्या
राज्यातील पत्रकारांना कॅशलेस उपचार सुविधा देणेबाबत
By nisha patil - 10/18/2025 3:27:06 PM
Share This News:
राज्यातील पत्रकारांना कॅशलेस उपचार सुविधा देणेबाबत
➡️आजरा(हसन तकीलदार) लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांच्या आरोग्य सुरक्षेबाबत नेहमीच काळजी आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांसाठी कॅशलेस उपचार सुविधा सुरु करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, आणि यासाठी अभ्यास समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
➡️वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. Hasan Mushrif जी यांच्या दालनात आयोजित पत्रकारांच्या आरोग्य विषयक बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीत मंत्रालय पत्रकार संघांचे प्रतिनिधी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तसेच आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
➡️पत्रकार संघटनांकडून कॅशलेस उपचार योजना सुरु करावी, वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत, शंकरराव चव्हाण आरोग्य सन्मान निधी वाढवावा, तसेच सेवानिवृत्त पत्रकारांना मोफत उपचार मिळावेत अशा मागण्या मांडल्या होत्या. या मागण्यांकडे सकारात्मक असून, यावर पुढील पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
➡️या अनुषंगाने आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण सचिव, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रतिनिधी, पत्रकार संघांचे प्रतिनिधी आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असलेली अभ्यास समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.
➡️राज्यातील सर्व पत्रकार बांधवांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी जिल्हा पातळीवर सुनिश्चित करणे आणि त्यांना महात्मा फुले, प्रधानमंत्री जन आरोग्य आणि वयवंदन योजना यांचा लाभ मिळवून देणे हा आमचा प्राथमिक उद्देश आहे. तसेच शंकरराव चव्हाण आरोग्य कल्याण निधी वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे.
➡️माझा विश्वास आहे की पत्रकार बांधव हे समाजाच्या प्रत्येक घटकाचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून त्यांच्या आरोग्य सुरक्षेबाबत शासन सकारात्मक आणि कटिबद्ध राहील.
➡️या बैठकीला आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव श्री. धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. चंदनवाले, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आणि राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती अध्यक्ष य. दु. जोशी उपस्थित होते.
राज्यातील पत्रकारांना कॅशलेस उपचार सुविधा देणेबाबत
|