बातम्या

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करा

Register for the World Skills Competition by September 30th


By Administrator - 8/9/2025 5:48:19 PM
Share This News:



जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करा  
            
कोल्हापूर, दि. 8  : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. पुढील जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाई येथे होणार आहे. स्पर्धेकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी  https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवून दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. 

 

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकीरता पात्रता निकष पुढीलप्रमाणे -
जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 63 क्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी विविध 50 क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2004 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. तर उर्वरित 13 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे  अनिवार्य आहे.

शांघाई येथे आयोजित जागतिक स्पर्धा 2026 जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक्स, इंजिनियरींग कॉलेज, हॉस्पिटॅलिटी इन्स्टीटयुट, IIT, CIPET, Corporate Technical Institute, Skill Training Centers, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellery Making, प्रशिक्षण संस्था, सर्व व्यससाय प्रशिक्षण संस्था यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका, कोल्हापूर दूरध्वनी क्र. 0231-2545677 येथे संपर्क साधावा.


जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करा
Total Views: 80