बातम्या

विद्यापीठामध्ये मागासवर्गीय उमेदवारांची नांव नोंदणी व महाविद्यालयस्तर स्थायी समिती पोर्टलचे लोकार्पण

Registration of names of backward class candidates in the university


By nisha patil - 1/10/2025 6:14:23 PM
Share This News:



विद्यापीठामध्ये मागासवर्गीय उमेदवारांची नांव नोंदणी व महाविद्यालयस्तर स्थायी समिती पोर्टलचे लोकार्पण

कोल्हापूर, दि.01 ऑक्टोंबर - शिवाजी विद्यापीठाच्या विशेष कक्ष विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे लोकार्पण कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. नेट,सेट,पी.एचडी आर्हताधारक मागासवर्गीय उमेदवारांची नांव नोंदणी आणि मागासवर्गीय महाविद्यालयस्तर स्थायी समितीच्या कामकाजाची माहिती या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन पोर्टलच्या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.  
 

सदर सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक संस्थां यांच्याबरोबरच नांव नोंदणी करिता पात्र विद्यार्थी/उमेदवार यांना ऑनलाईन पोर्टलद्वारे नावनोंदणी करणे सोयीचे होणार आहे.  तसेच, पोर्ट़ल़द्वारे महाराष्ट्रातील कोणत्याही भागामधील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी/उमेदवार यांना नांव नोंदणी करू शकणार आहेत.  यामुळे उमेदवारांच्या वेळीची व पैशांची बचत होणार आहे आणि डिजीटल साक्षरताही वाढणार आहे.  या पोर्टलच्या निर्मितीमध्ये संगणक कक्षाचे मोठे योगदान आहे.  
 

यावेळी विशेष कक्ष विभागाच्या उपकुलसचिव विभा अंत्रेडी, कायदा अधिकारी अनुष्का कदम, संगणक केंद्राचे प्रभारी संचालक अभिजीत रेडेकर,  उपकुलसचिव निवास माने, सहा.कुलसचिव वैशाली कुलकर्णी, आशिष घाटे यांचेसह विशेष कक्ष आणि संगणक केंद्रातील प्रशासकीय सेवक उपस्थितीत होते. 


विद्यापीठामध्ये मागासवर्गीय उमेदवारांची नांव नोंदणी व महाविद्यालयस्तर स्थायी समिती पोर्टलचे लोकार्पण
Total Views: 76