शैक्षणिक

कोल्हापूर : ३५ टक्क्यांनी उत्तीर्ण रेहानचा हटके जल्लोष

Rehan celebrates after passing with 35 percent


By nisha patil - 5/14/2025 11:03:18 PM
Share This News:



कोल्हापूर : ३५ टक्क्यांनी उत्तीर्ण रेहानचा हटके जल्लोष
 

कोल्हापूरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलचा विद्यार्थी रेहान पिरजादे दहावीच्या प्रत्येक विषयात नेमके ३५ गुण मिळवत उत्तीर्ण झाला. पास होईल का, ही शंका असतानाच मिळालेल्या या यशामुळे रेहानचा आनंद गगनात मावेनासा झाला. रविवार पेठेत मित्रांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हटके पद्धतीने जल्लोष साजरा केला. रेहानने ५०० पैकी १७५ गुण मिळवत परीक्षा पास केली असून, तो पुढे आयटीआय करून व्यवसाय करण्याचा विचार करतो आहे.

कोल्हापूर विभाग पुन्हा दुसऱ्या स्थानी
दहावीचा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूर विभाग ९६.८७% निकालासह राज्यात पुन्हा दुसऱ्या स्थानी राहिला. कोल्हापूर जिल्हा ९७.५२% निकालासह पहिल्या स्थानी आहे. विभागातील १३ विद्यार्थ्यांनी केवळ ३५ टक्के गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली असून, सोशल मीडियावर या विद्यार्थ्यांचीच सर्वाधिक चर्चा आहे.


कोल्हापूर : ३५ टक्क्यांनी उत्तीर्ण रेहानचा हटके जल्लोष
Total Views: 74