बातम्या

शहरात सापडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी संपर्क करावा

Relatives of the child found in the city should contact


By nisha patil - 8/20/2025 4:30:36 PM
Share This News:



शहरात सापडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी संपर्क करावा

कोल्हापूर, दि. 20 : कोल्हापूर शहरात विविध ठिकाणाहून मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा, नातेवाईकांचा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, बाल कल्याण समिती, कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर यांच्याकडून शोध सुरु असून या बालकांच्या पालक नातेवाईकांनी दिलेल्या दूरध्वनी, मोबाईल वर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष येवून भेटावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाईंगडे यांनी केले आहे.

बाल कल्याण समिती, कोल्हापूर यांच्या व्दारे एक अल्पवयीन मुलाला काळजी च संरक्षणाची गरज असल्याने त्यांना श्री दिलीपसिंह राजे घाटगे बालग्राम एस. ओ. एस. पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दाखल केले आहे. हे बालक जिल्ह्यातील सखी संघठनमार्फत समिती समोर हजर करण्यात आले होते. या बालकाच्या आईचा मृत्यू झाला असून त्यानंतर बालकाच्या कोणत्याही नातेवाईकांनी संपर्क केला नाही किंवा भेटायला आले नाहीत. या बालकास नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यासाठी बालकाच्या नातेवाईकांनी अध्यक्ष, सदस्य, बाल कल्याण समिती, कोल्हापूर, श्री दिलीपसिंह राजे घाटगे बालग्राम एस. ओ. एस. पन्हाळा, ता. पन्हाळा 9921410749 किंवा चाईल्ड लाईन, कोल्हापूर यांच्याशी दिलेल्या फोन नंबरवर 99923068135, 112,0231-2646600 वर 30 दिवसांच्या आत संपर्क करावा, असे आवाहन वाईंगडे यांनी केले आहे. 

कु. राजू तानाजी घाटगे वय 16 वर्ष 6 महिने

 


शहरात सापडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी संपर्क करावा
Total Views: 108