बातम्या
"सीपीआर डॉक्टरांना दिलासा...
By nisha patil - 7/5/2025 4:23:42 PM
Share This News:
"सीपीआर डॉक्टरांना दिलासा...
सत्यवान मोरे यांनी दिली कारवाई मागे घेतल्याची माहिती"
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात एका महिलेच्या मृत्यूनंतर सामाजिक संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठाता डॉ शिशिर मिरगुंडे जबाबदारी टाकत त्यांची पदमुक्ती करण्यात आली होती. मात्र प्राथमिक चौकशीत डॉक्टर आणि अधिष्ठाता दोषी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी माध्यमांना दिली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना व वैद्यकीय शिक्षण संघटनेने सीपीआर अधिष्ठाता कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. डॉक्टरांवर अन्यायकारक दबाव टाकणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली असून, संघटनेचे प्रतिनिधी पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
"सीपीआर डॉक्टरांना दिलासा...
|