बातम्या
रिंकू देसाईंना हायकोर्टाचा दिलासा; नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश रद्द
By nisha patil - 10/22/2026 3:31:45 PM
Share This News:
रिंकू देसाईंना हायकोर्टाचा दिलासा; नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश रद्द
कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक नऊचे भाजपचे नगरसेवक विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविणारा जातवैधता समितीचा आदेश रद्द करत, दोन आठवड्यांत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच नगरसेवकपद रद्द करण्याचा महापालिका आयुक्तांचा आदेशही रद्द करण्यात आला आहे.
जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत देसाई हे इतर मागास प्रवर्गातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. काँग्रेसचे प्रतिस्पर्धी नंदकुमार पिसे यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हरकत घेतली होती. त्यानंतर समितीने २५ जून रोजी प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. या निर्णयाच्या आधारे आयुक्तांनी ३ ऑगस्ट रोजी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. या दोन्ही आदेशांना देसाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
रिंकू देसाईंना हायकोर्टाचा दिलासा; नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश रद्द
|