बातम्या
एसटी प्रवाशांना दिलासा!
By nisha patil - 1/7/2025 4:55:51 PM
Share This News:
एसटी प्रवाशांना दिलासा!
लांब पल्ल्याच्या आगाऊ तिकिटावर 15 टक्के सूट 1 जुलैपासून लागू
राज्य परिवहन मंडळाकडून एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! जुलैपासून लांब व मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सूट दिली जाणार आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही योजना एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर केली होती. गर्दीचा हंगाम म्हणजे दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता, ही योजना वर्षभर लागू असणार आहे.
ही सवलत फक्त पूर्ण तिकीट धारण करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार आहे. सवलतधारक प्रवाशांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही योजना सर्व प्रकारच्या एसटी बससाठी लागू असणार आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ही योजना राबवण्यामागचा उद्देश म्हणजे गर्दीच्या बाहेरच्या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यावरचा आर्थिक बोजा थोडा हलका करणे, असा आहे.
एसटी प्रवाशांना दिलासा!
|