कृषी
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा : २,२१५ कोटींचा निधी मंजूर
By nisha patil - 9/23/2025 1:11:41 PM
Share This News:
मुंबई :- राज्य शासनाने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खरीप पिकांसाठी एकूण २,२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खरीप हंगामात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा पहिला निर्णय घेण्यात आला आहे.
मे महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी मंजूर निधी वितरित करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे खरीप हंगामातील कामकाज सुलभ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा : २,२१५ कोटींचा निधी मंजूर
|