बातम्या

कोल्हापुरात वाहतूक कोंडीवर उतारा; खासगी आरामदायी गाड्या कावळा नाका वहानतळात

Relief from traffic congestion in Kolhapur

By nisha patil - 7/17/2025 3:12:47 PM
Share This News:

कोल्हापुरात वाहतूक कोंडीवर उतारा; खासगी आरामदायी गाड्या कावळा नाका वहानतळात

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने खासगी आरामदायी गाड्या कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी मार्केटमधील वाहनतळात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या भागाची संयुक्त पाहणी केली. ट्रॅव्हल्स असोसिएशनने या निर्णयाला पाठिंबा दिला असून मागील भिंतीची उंची वाढवण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सव २०२५च्या पार्श्वभूमीवर इराणी खाणीची स्वच्छता पूर्ण झाली असून विसर्जनासाठी वॉच टॉवर, सीसीटीव्ही आणि आवश्यक नियोजनाचे आदेश मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.

कोल्हापुरात वाहतूक कोंडीवर उतारा; खासगी आरामदायी गाड्या कावळा नाका वहानतळात
Total Views: 62