बातम्या
कोल्हापुरातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५ लाख १७ हजारांचा मदतनिधी
By nisha patil - 4/10/2025 2:52:38 PM
Share This News:
कोल्हापुरातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५ लाख १७ हजारांचा मदतनिधी
कोल्हापूर, दि. ४ : मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी कोल्हापुरातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेत सढळ हाताने मदत केली आहे. नृसिंह सरस्वती देवस्थान, नृसिंह वाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी आणि सहकारी संस्था सदस्य यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांना सुपूर्द केला.
याशिवाय, ज्येष्ठ नागरिक संघ, हुपरी यांच्याकडून १५ हजार रुपयांचा धनादेशही या निधीसाठी प्राप्त झाला. आतापर्यंत एकूण ५ लाख १७ हजार १११ रुपयांचा मदतनिधी पूरग्रस्तांसाठी जमा झाला आहे, अशी माहिती कक्षाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत परुळेकर यांनी दिली.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, इच्छुकांनी पुढे येऊन चेक अथवा जीपे द्वारे आपल्या सामर्थ्यानुसार मदत करावी. अधिक माहिती आणि मदतीसाठी संपर्क क्रमांक ९५०३३८८७१५ वर संपर्क साधावा.
कोल्हापुरातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५ लाख १७ हजारांचा मदतनिधी
|