ताज्या बातम्या
प्रख्यात अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’मधील कर्ण म्हणून ओळखले जात होते
By nisha patil - 10/15/2025 3:55:35 PM
Share This News:
प्रख्यात अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’मधील कर्ण म्हणून ओळखले जात होते
कोल्हापूर/मुंबई – प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे आज (15 सप्टेंबर, बुधवार) निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मित्र आणि सहकारी अमित बहल यांनी दिली.
पंकज यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. तसेच ‘चंद्रकांता’मधील शिवदत्तच्या भूमिकेसाठीही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अभिनयाची ओळख ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’, ‘अजूनी’ आणि ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, ‘सडक’, ‘बादशाह’ यांसारख्या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनात राहिली आहे.
‘महाभारत’मधील अर्जुनाची भूमिका साकारलेल्या फिरोज खान यांनी पंकजच्या निधनावर दु:ख व्यक्त करत म्हटले, “हे खरंय की ते आता हयात नाहीत. वैयक्तिकदृष्ट्या मी माझ्या सर्वांत चांगल्या मित्राला गमावलंय. व्यक्ती म्हणून ते खूप चांगले होते. अजूनही मला विश्वास बसत नाही की त्यांचं निधन झालं आहे.”
पंकज धीर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रख्यात अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’मधील कर्ण म्हणून ओळखले जात होते
|