राजकीय
पेरणोली-वझरेमार्गाचीदुरुस्तीकरा-बहुजनमुक्तीपार्टीचीमागणी
By nisha patil - 10/31/2025 12:37:31 PM
Share This News:
आजरा(हसनतकीलदार):- परणोली ते वझरे मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे झालेल्या दुरावस्थेची दुरुस्ती तात्काळ करून घ्यावी असे निवेदनबहुजनमुक्तीपार्टीच्यावतीनेआजरासार्वजनिकबांधकामविभागाला देण्यात आले आहे.
पेरणोली ते वझरे या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मुरूम, माती, दगड इत्यादी रस्त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सामग्रीचे वाहतूक करणारे डंपर, ट्रक, मिक्सर,जेसीबी, आदि वाहने सतत ये जा करीत आहेत. यामुळे सदर रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी तर अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.ज्यामुळे छोट्या चार चाकी वाहने व दुचाकी यांना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
सदर रस्ता हा काही महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या अवस्थेत होता परंतु इतर ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या व इतर कामांच्या दळणवळणामुळे सदर रस्त्याची पार दुरावस्था झालेली आहे. रस्त्याची अशाप्रकारे झालेली दुरावस्था अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण करू शकते या रस्त्याला अनेक मोठे अपघात होऊन जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे जे गारगोटी ते आजरा रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी जो पर्यायी मार्ग आहे त्या मार्गावरून मोठ्या अवजड वाहनांची ये जा सुरू असल्याकारणाने नागरीकांना वाहतुकीची मोठी समस्या जाणवत आहे.
अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या पर्यायी रस्त्याची दुरावस्था झालेली दिसते.त्यामुळे या येणाऱ्या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी वाहतुकीची गैरसोय दूर करावी असे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.यावेळी डॉ.सुदाम हरेर,सूर्यकांत कांबळे,अमित सुळेकर,अनिल प्रधान,सुरेश दिवेकर आदिजण उपस्थित होते.
पेरणोली-वझरेमार्गाचीदुरुस्तीकरा-बहुजनमुक्तीपार्टीचीमागणी
|