बातम्या

*मडिलगे ता. आजरा येथील आडाचीगल्लीचा रस्ता दुरुस्त करा

Repair the Adachigalli road in Madilge


By nisha patil - 8/10/2026 11:41:32 PM
Share This News:



*मडिलगे ता. आजरा येथील आडाचीगल्लीचा रस्ता दुरुस्त करा

मनसेचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन

*आजरा(हसन तकीलदार):-मौजे मडिलगे ता. आजरा येथील आडाची गल्ली येथील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. या रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरु असते. याच रस्त्यावर पिठाची गिरण असल्यामुळे महिला तसेच दुचाकीस्वार नियमित ये जा करीत असतात. अपघात होऊन कोणतीही जीवित हानी होण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष आनंदा घंटे यांनी ग्रामविकास अधिकारी, मडिलगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   

रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असल्यामुळे दुचाकीस्वारांचे अनेकवेळा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाल्याच्या घटना याअगोदर घडल्या आहेत. तसेच या रस्त्यावरून रुग्णांना दवाखान्यापर्यंत ने आण करणे देखील अत्यंत अडचणीचे व जिकरीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा लेखी व तोंडी मागणी करूनही अद्याप रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सदर रस्त्यावर देशसेवा बजावलेले निवृत्त सैनिक रहात असून त्यांनीसुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार करून याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केलेले आहेत. तरीसुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई न झालेस कार्यालयासमोर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर आनंदा घंटे(मनसे तालुकाध्यक्ष), कृष्णा पाटील (माजी सैनिक), कविता घंटे(सदस्या ग्रामपंचायत मडिलगे), राकेश रांगणेकर, सुदाम पाटील, वेदांत लकमले, विनायक घंटे(शाखाध्यक्ष, मडिलगे), वसंत घाटगे(वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मनसे ), अशोक लकमले आदींच्या सह्या आहेत.


*मडिलगे ता. आजरा येथील आडाचीगल्लीचा रस्ता दुरुस्त करा
Total Views: 6