बातम्या

आजऱ्याच्या "रामाची विहीर"दुरुस्त करा-नगरसेविका स्मिता कुंभार यांचे नगरपंचायतीला निवेदन

Repair the Rams Well in Ajya  Municipal worker Smita Kumbhar


By Administrator - 3/24/2026 4:30:40 PM
Share This News:



आजऱ्याच्या "रामाची विहीर"दुरुस्त करा-नगरसेविका स्मिता कुंभार यांचे नगरपंचायतीला निवेदन
 

आजरा(हसन तकीलदार)*:-आजऱ्यातील नगरपंचयतीजवळील श्रीराम मंदिर समोरील "रामाची विहीर" अशी पारंपरिक ओळख असणारी तसेच सर्व जाती,धर्मांसाठी खुली असणारी सार्वजनिक विहीर आहे.या विहीरचं वैशिष्ठ म्हणजे पूर्वी आजऱ्यातील सर्व विहिरी आटायच्या परंतु रामाची विहीर ही एकमेव विहीर होती जी कधीही आजतागायत आटली नाही. सर्व गल्ल्यांची तहान भागवण्याचे काम या विहिरीने चोख बजावले आहे. परंतु आज या विहिरीची दुरावस्था झाली आहे. त्यासाठी दुरुस्ती होणे काळाची गरज बनली आहे. दुरुस्ती व्हावी यासाठी नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे.
   

आजऱ्यातील बहुतांशी विहिरी जागेच्या स्वार्थापोटी बळी ठरल्या आहेत. शरीराच्या स्वास्थ्यांसाठी विहिरीचं पाणी योग्य असल्याचे काही जाणकारांचे मत आहे. ठराविक गल्ल्यामध्ये आता विहिरी आहेत तर ठराविक गल्ल्यातील विहिरी मोक्याच्या जागा हडपण्याच्या नादात बळी ठरल्या आहेत. "रामाची विहीर "ही कुंभार गल्ली, रामदेव गल्ली, बाजार लाईन, सिद्धार्थ नगर यांना पाण्यासाठी वापरात येत आहे.परवा झालेल्या वळीव पावसामुळे गटरचे पाणी मिसळून विहिरीचे पाणी पूर्णपणे दूषित व दुर्गंधि युक्त झाले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे..
 

या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पाणी कधीही आटलेले नाही, तालुक्यात धरणाचं जाळं नसताना याच विहिरीने  पूर्वी आजरेकरांची  तहान भागवली आहे, ही विहीर म्हणजे आजऱ्याच्या  ऐतिहासिक वैभवाचा वारसा एक आहे,त्यामुळे ती जतन करण्यासाठी आम्ही नागरिक तर कटिबद्ध आहोतच,पण याला प्रशासनाची पण साथ लाभावी या करिता आज रामदेव गल्ली रहिवाशी यांच्या सोबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे,या विहिरीची पुनर्बांधणी, गाळ काढणे, स्वच्छता,रंगरंगोटी आणि आरोग्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता होण्यासाठी भरीव निधीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी कुंभार गल्ली, रामदेव गल्ली व शेजारील गल्लीतील नागरिक उपस्थित होते.निवेदनावर डॉ. सौ. स्मिता सुधीर कुंभार यांची स्वाक्षरी आहे.


आजऱ्याच्या "रामाची विहीर"दुरुस्त करा-नगरसेविका स्मिता कुंभार यांचे नगरपंचायतीला निवेदन
Total Views: 293