बातम्या
मराठा समाज आरक्षणासाठी समता परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By nisha patil - 9/9/2025 4:37:44 PM
Share This News:
मराठा समाज आरक्षणासाठी समता परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याने आरक्षण मिळावं, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष स्वाती मंगेश फाळके, कार्याध्यक्ष सानी सतीश गायकवाड, अॅड. उषाबाई जाधव, सोनाली मंगेश शहा, दादासाहेब कांबळे, मंगेश काले, गुलाबराव पाटील, गणेश फुले, शरद निकम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
समता परिषदेनं दिलेलं हे निवेदन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
मराठा समाज आरक्षणासाठी समता परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
|