राजकीय
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई )गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
By nisha patil - 10/13/2025 11:58:42 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)गटाचा बुरुडे ता. आजरा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरानी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांनी एकत्रित येऊन एक दिलाने काम करूया असेही सांगण्यात आले.
बुरुडे ता. आजरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानिमित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आजरा सूतगिरणीचे संचालक शशिकांत सावंत यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग कांबळे (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष)हे होते. दलितमित्र पी. एस. कांबळे (राष्ट्रीय उपाध्यक्ष), आर. एस. कांबळे (जिल्हा कार्याध्यक्ष), बबन कांबळे(तालुकाध्यक्ष भुदरगड) तसेच सुभाष कांबळे (तालुका सरचिटणीस भुदरगड)आदिनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आभार शंकर कांबळे यांनी मानले.
यावेळी दीपक जमणे (महावितरण सहाय्य्क अभियंता, आजरा ), विष्णू कांबळे, मोहन कांबळे, महेश कांबळे, बाबुराव होन्याळकर, सुभाष तेंडुलकर, अविनाश कांबळे, भीमराव जोशीलकर, पांडुरंग बागवे, हणमंत जोशीलकर, तानाजी कांबळे, शशिकांत सावंत, संभाजी कांबळे, धर्मेंद्र कांबळे, अर्जुन बोलके यांच्यासह भीमराव तरुण मंडळ, रखवालदार तरुण मंडळ बुरुडे, भटवाडी तसेच आजरा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई )गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
|