बातम्या

पन्हाळा तालुक्यात १११ सरपंचपदांची आरक्षण सोडत पार, यादी जाहीर

Reservation for 111 sarpanch posts in Panhala taluka cancelled


By nisha patil - 7/21/2025 10:15:02 PM
Share This News:



पन्हाळा तालुक्यात १११ सरपंचपदांची आरक्षण सोडत पार, यादी जाहीर

पन्हाळा (प्रतिनिधी) – पन्हाळा तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रतिक्षित सोडत आज मंगळवार, दिनांक २१ जुलै रोजी यशस्वीरित्या पार पडली. ही आरक्षण प्रक्रिया गंगानगर येथील मयूर वाचनालय सभागृहात पार पडली असून, या वेळी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे.

तालुक्यातील सर्व १११ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आली.

यावेळी तहसीलदार, पंचायत समितीचे अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण यादी जाहीर होताच संभाव्य उमेदवारांत चुरस आणि हालचालींना सुरुवात झाली आहे.

या यादीनुसार निवडणुकीच्या तयारीस अधिकृत प्रारंभ झाला असून, येत्या काळात उमेदवारांची घरोघरी जनसंपर्क मोहीम, प्रचार व योजनांचे आराखडे उभे राहण्यास सुरुवात होणार आहे.

संपूर्ण यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात आणि तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.


पन्हाळा तालुक्यात १११ सरपंचपदांची आरक्षण सोडत पार, यादी जाहीर
Total Views: 160