राजकीय

पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला

Reservation for the post of chairman of Panchayat Samiti


By nisha patil - 11/10/2025 5:47:44 PM
Share This News:



पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला

​कोल्हापूर, दि. ११  : कोल्हापूर जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीची आरक्षण सोडत सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सकाळी ११.३० वाजता हा सोडतीचा कार्यक्रम  होणार आहे.

​राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्देशित केल्यानुसार हा आरक्षण सोडत कार्यक्रम  राबविला जाणार आहे. या आरक्षण सोडत कार्यक्रमास जिल्ह्यातील ज्या नागरिकांना व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहायचे आहे, वेळेत उपस्थित रहावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.


पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला
Total Views: 37