शैक्षणिक
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय चे शिवाजी विद्यापीठांमध्ये निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न
By Administrator - 1/28/2026 12:57:23 PM
Share This News:
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय चे शिवाजी विद्यापीठांमध्ये निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न
कोल्हापूर : 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागाचे शिवाजी विद्यापीठांमध्ये निवासी श्रमसंस्कार शिबिर अत्यंत उत्साहपूर्व वातावरणामध्ये संपन्न झाले. या शिबिरामध्ये वृक्ष संवर्धनाचे धडे गिरवले तसेच श्रमदानाबरोबरच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जडणघडणेसाठी आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता व कर्तव्याची जाणीव आणि जागृती निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रम संपन्न झाले, त्यामध्ये- योगासन, व्यक्तिमत्व विकास, करवीर महाराणी ताराबाई, युवक आणि मानसिक आरोग्य, पर्यावरण जनजागृती, शिवकालीन मराठा आरमार इत्यादी विषयावर अनेक नामवंत विचारवंतांची व्याख्याने झाली
शिबिर चालू असतानाच 25 जानेवारी रोजी एन.एस.एस. विभागाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती या विषयावरती कलेक्टर ऑफिस येथे पथनाट्याचे सादरीकरण केले. निवासी शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ संचालक, डॉ. टी. एम. चौगुले,श्री सुजित मुंडे व श्री अनिकेत पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या शिबिरासाठी माननीय श्री मानसिंगराव बोंद्रे दादा (चेअरमन, शाहू शिक्षण संस्था), प्राचार्य, डॉ. आर. के. शानेदिवाण, डॉ. आर. डी. मांडणीकर, श्री रवींद्र भोसले (प्रबंधक), श्री मनीष भोसले (अधीक्षक) यांचे विशेष प्रोत्साहन व सहकार्य लाभले. या शिबिराचे आयोजन व नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय देठे , प्रा. संतोष कांबळे, डॉ. सुनिता राठोड यांनी केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय चे शिवाजी विद्यापीठांमध्ये निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न
|