बातम्या

कोल्हापूरकरांनो, दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; 

Residents of Kolhapur water supply


By nisha patil - 10/23/2026 5:00:19 PM
Share This News:



कोल्हापूरकरांनो, दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; 


अनेक भागांना फटका  काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर आयसोलेटर बसविण्याचे काम २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत काळम्मावाडी योजनेचा वीजपुरवठा बंद राहणार असून, शहराचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
 

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र, शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही.
 

शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, कसबा बावडा, शाहूपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, टेंबलाईवाडी यांसह शहरातील अनेक भागांवर याचा परिणाम होणार आहे.२८ ऑक्टोबर रोजीही काही भागांत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.


कोल्हापूरकरांनो, दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; 
Total Views: 17