राजकीय
पन्हाळा नगरपरिषदेत जनसुराज्य–भाजप आघाडीचा दणदणीत विजय
By nisha patil - 12/21/2025 11:30:19 AM
Share This News:
पन्हाळा :- पन्हाळा नगरपरिषदेवर अखेर जनसुराज्यचा झेंडा फडकला असून, जनसुराज्य–भाजप आघाडीने एकूण 16 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालामुळे पन्हाळा शहराच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत आहे.
नगरपरिषद निवडणुकीत जनतेने विकासाला पसंती देत जनसुराज्य–भाजप आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला. या विजयामुळे आगामी काळात पन्हाळा शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आले आहे.
पन्हाळा नगरपरिषदेत जनसुराज्य–भाजप आघाडीचा दणदणीत विजय
|