बातम्या

जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये आरोग्य शिबिरास प्रतिसाद

Response to health camp in Kolhapur on World Health Day


By Administrator - 9/4/2026 3:20:08 PM
Share This News:



जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये आरोग्य शिबिरास प्रतिसाद

377 जणांना मिळाली आरोग्य संजीवनी 

कोल्हापूर: जागतिक आरोग्य दिनानिमित्त शिवसेना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून राजेंद्रनगर कोल्हापूर येथे आरोग्य शिबिर पार पडले. सदर शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, महापौर रुपाराणी निकम, दक्षिण विधानसभा अध्यक्ष शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण सभापती कौसर बागवान, राजारामपुरी पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या हस्ते पार पडले.

शिवसेना महिला उपशहर प्रमुख सौ पूजा अडदंडे यांच्या पुढाकाराने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे यांनी शिबिराचे संयोजन केले होते.

सदर शिबिरामध्ये बालरोग, कानतपासणी, हृदयरोग, सांधेविकार, जनरल तपासणी, स्त्रीरोग, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, जनरल सर्जन, मेडिसिन या तपासणीसह मोफत औषधे वितरित करून तसेच या ठिकाणी आयुष्मान भारत कार्डही काढून दिले. सदर शिबिरासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हाप्रमुख मनमोहन खोत, शिवसेना दक्षिण शहर अध्यक्ष महेंद्र घाटगे, उप जिल्हा प्रमुख दिपक चव्हाण, दक्षिण शहर समन्वयक संतोष घाटगे, नगरसेवक बबन मोकाशी, संग्रामसिंह निकम, तालुका प्रमुख पिंटू खडके, तालुका प्रमुख प्रकाश सूर्यवंशी, उपशहरप्रमुख मारुती पोवार, उपशहरप्रमुख नजीर पठाण, उपशहरप्रमुख किरण पाटील, उपशहरप्रमुख क्रांतिकुमार पाटील, उपशहरप्रमुख प्रदीप पाटील, विभाग प्रमुख धैर्यशील शिंदे, विभाग प्रमुख सौ.स्वाती घाटगे, सौ गीता पोवार, सुनील अरदांडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गगनबावडा तालुकाप्रमुख अक्षय साखरे, शहरप्रमुख विनायक जाधव, अतुल साळोखे यांचे सहकार्य लाभले.

या शिबिरासाठी आयसोलेशन-प्राथमिक आरोग्य केंद्र, सिद्धिविनायक हर्ट हॉस्पिटल, नंदादीप आय हॉस्पिटल, जानकी हॉस्पिटल, सनराइज् हॉस्पिटल, अथायू हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, हिअरझॅप, साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.


जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये आरोग्य शिबिरास प्रतिसाद
Total Views: 35