बातम्या
हिंदुत्ववादी संघटनांची जबाबदारी – पंचगंगा घाटाची दोन दिवसात स्वच्छता
By nisha patil - 12/9/2025 3:37:41 PM
Share This News:
हिंदुत्ववादी संघटनांची जबाबदारी – पंचगंगा घाटाची दोन दिवसात स्वच्छता
विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग; पंचगंगा नदी घाट पुन्हा स्वच्छ
गणेश विसर्जनानंतर पंचगंगा नदी घाटावर पाणी उतरल्याने काही मूर्ती दिसू लागल्या होत्या. यावरून काही व्यक्तींनी व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करत हिंदुत्ववादी संघटनांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जबाबदारी स्वीकारत कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी सलग दोन दिवस स्वच्छता मोहीम राबवून पंचगंगा नदी घाट संपूर्ण स्वच्छ केला.
या मोहिमेत पंचगंगा आरती महामंडळ, बुधवार पेठेतील नागरिक, तसेच महावीर कॉलेज (एनएसएस विभाग), राजाराम कॉलेज, विवेकानंद कॉलेज (एनएसएस विभाग), शहाजी कॉलेज (एनसीसी विभाग) यांचे विद्यार्थी व विद्यार्थिनींसह कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारीही सहभागी झाले. विशेषतः विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग कौतुकास्पद ठरला. हिंदुत्ववादी संघटनांनी पुढील वर्षीही हिंदू परंपरेनुसार वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा संकल्प केला.
हिंदुत्ववादी संघटनांची जबाबदारी – पंचगंगा घाटाची दोन दिवसात स्वच्छता
|