बातम्या
*गॅस पुरवठा पूर्ववत करा, हॉटेल व्यवसायिकांचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
By nisha patil - 12/3/2026 11:04:38 PM
Share This News:
*गॅस पुरवठा पूर्ववत करा, हॉटेल व्यवसायिकांचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
आजरा (हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील बहुतांशी लोक आजरा हे मध्यवर्ती ठिकाण असलेने चहाची टपरी, हॉटेल, भोजनालय या व्यवसायात गुंतलेली आहेत. बरेचशे सुशिक्षित बेरोजगार युवक चहाची टपरी आणि चायनीज सेंटर गाडे सुरु करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु सद्या गॅसची टंचाई व व्यवसायिक गॅस सिलेंडर वितरण ठप्प झालेने हॉटेल व्यवसायिकांच्या धंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. पूर्ववत गॅस सिलेंडर वितरण करावेत यासाठी तालुका हॉटेल असोसिएशन तर्फे तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले आहे.
सद्या इराण व इझराईल यांच्या दरम्यान युद्ध सुरु असलेने संपूर्ण जगावर गॅस व इंधन टंचाईचे संकट आले आहे. परंतु आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात बरीचशी कुटुंबे ही चहाच्या टपरी, हॉटेल, भोजनालये आणि चायनीज सेंटर याच्यावर अवलंबून आहेत. परंतु सद्य परिस्थिती पाहता व्यवसायिक गॅस वितरण पूर्णपणे ठप्प आहे.
त्यामुळे आजरा शहरात हॉटेल व्यवसायिकांना गॅस पुरवठा सुरळीत व योग्य दरात द्यावा नाहीतर या हॉटेल व्यवसायिकांना आपला व्यवसाय बंद करून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे व्यावसयिक गॅस पुरवठा वेळेत व योग्य दराने करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आजरा तालुक्याचे ठिकाण असलेने याठिकाणी विविध संस्थांच्यामध्ये काम करणारे बाहेरगावचे कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे शासकीय व इतर कामासाठी येणारे खेड्यापाड्याचे लोक, शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी यांना जेवणपाण्यासाठी हॉटेल व भोजनालय ही एकमेव पर्याय आहेत. जर ही हॉटेल व भोजनालये बंद झाली तर यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना व्यावसायिक गॅस पूरववठा होणे गरजेचे आहे. ज्यांचा या व्यवसायावर संसाराचा गाडा सुरु आहे अशा लोकांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. असे मत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
यावेळी शिवाजीराव गुडूळकर, निलेश घाटगे, मुकुंद फडके,अशरफ मलबारी, राजेश विभुते, अभिजित रांगणेकर, वाय. जी. इंजल, अभिषेक हुक्केरी, हुसेन लतीफ, शब्बीर मलबारी, वैभव फडके आदिजण उपस्थित होते.
*गॅस पुरवठा पूर्ववत करा, हॉटेल व्यवसायिकांचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
|