ताज्या बातम्या
महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, मिञ परिवारामार्फत महापालिकेच्या स्मशानभूमीस 25 हजार शेणी
By Administrator - 12/1/2026 7:31:01 PM
Share This News:
कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने शहरातील पंचगंगा, कसबा बावडा, बापट कॅम्प व कदमवाडी या 4 ठिकाणी स्मशानभूमी आहेत. सद्यस्थितीत पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणेकरिता शेणीची आवश्यकता असलेने शहरातील दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यांना महानगरपालिकेमार्फत पंचगंगा स्मशानभूमी येथे शेणी देवून महानगरपालिकेस सहकार्य करणेबाबत आवाहन केले आहे.
या आवाहनास प्रतिसाद देऊन कोल्हापूर महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी मिञ परिवार मार्फत आज पंचगंगा स्मशानभूमीस 25 हजार शेणी देण्यात आल्या. सदरच्या शेणी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्याकडे सुर्पूद केल्या. महापालिकेच्यावतीने सेवानिवृत्त संघटनेच्या सदस्यांचे मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांनी आभार मानले. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, मिञ परिवारामार्फत महापालिकेच्या स्मशानभूमीस 25 हजार शेणी
|