बातम्या
महसूल सप्ताहास कोल्हापुरात उत्साहात प्रारंभ
By nisha patil - 1/8/2025 10:10:15 PM
Share This News:
महसूल सप्ताहास कोल्हापुरात उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर (1 ऑगस्ट) – महसूल सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात झाले. या वेळी सीईओ एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक योगेश कुमार उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याचे आवाहन केले, तर कार्तिकेयन यांनी प्रशासनात तंत्रज्ञानाची जोड देण्याचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
सप्ताहात अतिक्रमण पट्टे वाटप, शिवरस्ते मोजणी, डीबीटी शिबिरे, अतिक्रमण हटाव, एम-सँड धोरण यासह विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
महसूल सप्ताहास कोल्हापुरात उत्साहात प्रारंभ
|