बातम्या
आयुक्त मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
By nisha patil - 11/18/2025 3:26:50 PM
Share This News:
आयुक्त मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना वेगात...
कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि विनिमय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक झाली. यात वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या प्रमुख मार्गांची माहिती देत तातडीच्या सुधारणांची मागणी केली.
प्रशासकांनी शहराच्या प्रवेशद्वारांवर गँट्री आणि दिशादर्शक लावण्याचे आदेश दिले. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी थर्मोप्लास्ट पट्टे, माहिती फलक आणि सावधानतेचे बोर्ड त्वरित बसविण्याचे निर्देश दिले. व्यावसायिक आस्थापनांतील पार्किंगचा योग्य वापर होत आहे की नाही याची तपासणी नगररचना विभागाला सांगण्यात आली.
बैठकीत प्रकल्प विभागाने 2025-26 रोड विनियमन उपाययोजना सादर केल्या, तर अतिक्रमण विभागाने रस्त्यांवरील फेरीवाल्यांविरोधातील चालू कारवाईची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी रस्ते अतिक्रमण दूर करण्यासाठी दैनंदिन कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
या बैठकीस महानगरपालिकेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते...
आयुक्त मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
|