विशेष बातम्या
कबनूर ग्रामपंचायतीत विकासकामांचा आढावा बैठक
By nisha patil - 7/6/2025 3:39:28 PM
Share This News:
कबनूर ग्रामपंचायतीत विकासकामांचा आढावा बैठक
कबनूर (ता. हातकणंगले) | कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
या बैठकीत जलजीवन योजना, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सद्यस्थितीचा आढावा घेत पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कबनूर ग्रामपंचायतीत विकासकामांचा आढावा बैठक
|