विशेष बातम्या
विवेकानंद संस्थेकडून ए.आय. आणि रोबोटिक्स अभ्यासक्रमाची क्रांतीकारक सुरुवात – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन
By nisha patil - 9/6/2025 4:55:09 PM
Share This News:
विवेकानंद संस्थेकडून ए.आय. आणि रोबोटिक्स अभ्यासक्रमाची क्रांतीकारक सुरुवात
– पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर, दि. 9 : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने ए.आय. आणि रोबोटिक्स या नवीन अभ्यासक्रमाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले, "विवेकानंद संस्थेने शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून क्रांतीकारक पाऊल उचलले आहे. ए.आय. आणि रोबोटिक्ससारखे अभ्यासक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना भविष्याच्या शर्यतीत आघाडीवर नेतील."
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, सेक्रेटरी सौ. शुभांगी गावडे, डॉ. मिलिंद हुजरे, डॉ. आर.आर. कुंभार, श्रीराम साळुंखे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात नवीन अभ्यासक्रम पुस्तिकेचे वितरण, पुस्तक प्रकाशन, मान्यवरांचा सत्कार, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व भक्तिगीत सादरीकरण असे अनेक उपक्रम पार पडले. दुपारी मुख्याध्यापकांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
विवेकानंद संस्थेकडून ए.आय. आणि रोबोटिक्स अभ्यासक्रमाची क्रांतीकारक सुरुवात – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन
|