राजकीय

बहुजन मुक्ती पार्टीचे क्रांतिकारी पाऊल. स्टॅम्पपेपरवर घोषणापत्र

Revolutionary step of Bahujan Mukti Party


By nisha patil - 11/29/2025 2:35:37 PM
Share This News:




आजरा(हसन तकीलदार):- आजरा नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये दिवसेंदिवस रंगत वाढतच चाललीय. एकमेकांचा पाठिंबा घेण्याची जणू चढाओढच लागली असल्याचे चित्र दिसत आहे. साम,दाम,दंड,भेद सर्व नितींचा वापर केला जात आहे. परंतु बहुजन मुक्ती पार्टीने मात्र एक क्रांतिकारी पाऊल उचलून निवडणूकीमध्ये एक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पक्षाचे घोषणापत्र सरळ स्टॅम्प पेपरवर लिहून मतदारांच्यापर्यंत पोहचून आपली भूमिका मांडत आहेत.
     पैसे आणि अमीषे देऊन निवडणुका लढवणे आता आम झाले आहे. परंतु मी कोणतीही दमडी देणार नाही केवळ कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार अशी क्रांतिकारी विचारसरणी घेऊन बहुजन मुक्ती पार्टी मतदार बंधू भगिनीसमोर जात आहे. आजकाल निवडणूक ही केवळ घराणेशाही आणि पैशेवाल्यांचीच होऊन बसली आहे. यासाठी सर्वसामान्य निष्कलंक, प्रामाणिक लोकांना या निवडणूकीपासून अलिप्त राहावं लागत आहे. त्यामुळे राजकारणाची दिशा आणि दशा बिघडली आहे.

यासाठीच बहुजन मुक्ती पार्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलत फक्त तीनच वॉर्डात आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अनेक जण इच्छुक होते परंतु स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे लागणार ही अट ऐकताच पुढे कोणीच यायला तयार झाले नाही ही परिस्थिती आहे. या अगोदर त्यांनी काही गावामध्ये हा प्रयोग केला आहे आणि त्यामध्ये त्यांना यशही आले आहे. त्यामुळे आजऱ्याच्या निवडणू्कीमध्ये जनता कितपत साथ देणार हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला उमेदवार निवडून गेला तर त्याला लिहून दिलेली 43 कामे बंधनकारक राहणार आहेत. कोणताही लवाजमा न घेता आपल्या निष्ठावंत शिलेदारासह बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने हे स्वतः घर टू घर आपल्या पक्षाची भूमिका पटवून देत उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. प्रभाग क्र. 7 मधून गीताताई नंदकुमार कांबळे चिन्ह एअर कंडिशन, प्रभाग क्र. 12 मधून समिरभाई तकीलदार चिन्ह कपाट आणि प्रभाग क्र. 16 मधून अश्विनी विजय कांबळे चिन्ह टेबल या तिन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


बहुजन मुक्ती पार्टीचे क्रांतिकारी पाऊल. स्टॅम्पपेपरवर घोषणापत्र
Total Views: 16