बातम्या

पाचगावमध्ये रिक्षा चालकाचा खून करून घराला आग

Rickshaw driver murdered


By nisha patil - 4/9/2025 6:09:29 PM
Share This News:



पाचगावमध्ये रिक्षा चालकाचा खून करून घराला आग

कोल्हापूरच्या पाचगाव रोडवरील हनुमान नगर परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. रिक्षा चालक मोहन नारायण पवार (वय ७२) यांचा गळा चिरून खून करण्यात आला असून, खुनींनी पुरावे नष्ट करण्यासाठी देवाऱ्यातील समईने गादीला आग लावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आग भडकताच शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. घराचा दरवाजा उघडून पाहिले असता, मोहन पवार यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजीव झाडे, ठसे तज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे.


पाचगावमध्ये रिक्षा चालकाचा खून करून घराला आग
Total Views: 88