खेळ
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम मध्ये रिया पाटील चे यश.
By nisha patil - 5/12/2025 2:30:41 PM
Share This News:
कोल्हापूर दि. 5 : १ डिसेंबर ते ४ डिसेंबर २०२५ रोजी राजस्थान येथे झालेल्या ५ वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाची एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स भाग १ मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कु. रिया नितीन पाटील हिने ८०० मीटर धावणे स्पर्धे मध्ये ब्राँझ मेडल मिळवून मानाचा तुरा रोवत देशभरात महाविद्यालयाचे नाव लौकिक केले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यशस्वी खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात, आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.श्रुती जोशी,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रशिक्षक प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के धनवडे, श्री. सुरेश चरापले, आई व वडील यांचे मार्गदर्शन लाभले.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम मध्ये रिया पाटील चे यश.
|