बातम्या
प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ता बांधकामाचे शुभारंभ
By Administrator - 5/3/2026 2:39:31 PM
Share This News:
प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ता बांधकामाचे शुभारंभ
आजरा(हसन तकीलदार):- आजरा नगरपंचायत प्रभाग क्रमांक १५ मधील ख्रिश्चन स्मशानभूमी ते चर्चजवळील विहीर या रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) व डॉ. श्रदानंद ठाकुर, यांच्या हस्ते करण्यात आले.
यायाप्रसंगी नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी संबंधित ठेकेदाराला काम दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिकांकडून कोणतीही तक्रार येणार नाही अशा पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
तसेच या कामाबाबत स्थानिक नागरिकांना काही तक्रार किंवा अडचण असल्यास ती त्वरित कळवावी, अशा सूचनाही नगरसेवक बामणे भाऊजी यांनी तेथील नागरिकांना केल्या. रस्ता बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून हा रस्ता मंजूर झालेला आहे. यावेळी अशोक पोवार, महादेव जाधव, मिनीन डिसोझा, मोतीराम बार्देसकर, पांडुरंग सावरतकर, संतोष भाटले, रवींद्र पारपोलकर, आश्रम सांबरेकर, अनिल पाटील, रामचंद्र पंडित, तानाजी शिंदे, मदन तानवडे, जोतीबा आजगेकर तसेच चर्च गल्लीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ता बांधकामाचे शुभारंभ
|