विशेष बातम्या

शेळके शहापूर येथे रस्त्याचा विकास; आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

Road development at Shelke Shahapur


By nisha patil - 5/17/2025 3:14:11 PM
Share This News:



शेळके शहापूर येथे रस्त्याचा विकास; आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

शेळके शहापूर (ता. करवीर) – माजी मंत्री तथा आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून योगासन हॉलच्या मागील रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यात आला आहे. या निधीतून रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले असून, स्थानिक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

या रस्त्यामुळे ये-जा करण्यासाठीची सुविधा अधिक सुकर झाली असून, परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण विकास कामाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.

या उद्घाटन प्रसंगी दादासो भाटले, भाऊसो आवळे, किसन शिंदे, रणजीत अनुसे, राजू कबाडे, निवृत्ती पाटील, अनिल बमनावर, अशोक पुजारी, सुरेश चव्हाण, मुकुंद पालकर, महादेव घाळी, संजय टोणे, अनंत बोरगावे, मोहन बोरगावे, डॉ. आरगे, हेमंत साळुंखे, सचिन भाटले, संदीप बिराजदार, संग्राम दिसिंगे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी स्थानिक स्तरावर विशेष मेहनत घेण्यात आली. या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


शेळके शहापूर येथे रस्त्याचा विकास; आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
Total Views: 107