खेळ

  रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी – टी-20 मध्ये नवा विक्रम

Rohit Sharmas historic achievement


By nisha patil - 4/24/2025 6:09:36 PM
Share This News:



  रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी – टी-20 मध्ये नवा विक्रम

टी-20 मध्ये 8000 जिंकवलेल्या धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय

आयपीएल 2025 मधील रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सनी पराभव केला. मुंबईकडून रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने केवळ 70 धावांच्या खेळीत आठ चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली.

या अर्धशतकासह रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधील एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जिंकलेल्या सामन्यांमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सध्या त्याच्या खात्यात 8,056 धावा जमा आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये अशी विक्रमी कामगिरी आजवर कोणत्याही भारतीय खेळाडूने केली नव्हती.


  रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी – टी-20 मध्ये नवा विक्रम
Total Views: 142