बातम्या
रोझरी इंग्लिश स्कुलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*
By nisha patil - 6/26/2026 8:36:18 PM
Share This News:
**रोझरी इंग्लिश स्कुलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*
**आजरा(हसन तकीलदार)*:- रोजरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शाळेचे मुख्याध्यापक मनवेल बारदेस्कर व पर्यवेक्षक विजय केसरकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक स्टीफन डिसूजा, सौ. शैलजा कांबळे तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी सोहम शिंदे, सिद्धी जाधव आणि स्पंदन धडाम यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी आणि जीवनाविषयी आपली मनोगते व्यक्त करताना सविस्तर माहिती सादर केली . त्यानंतर विजय केसरकर यांनी आपल्या भाषणातून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या समाजसुधारक कार्याचा, सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. विविध ऐतिहासिक उदाहरणांच्या माध्यमातून शाहू महाराजांना 'लोकराजा' ही पदवी का प्राप्त झाली, याचे प्रभावी साचेबद्धपणे विवेचन त्यांनी केले.
या कार्यक्रमास शाळेचे व्यवस्थापक फादर मेल्विन पायस यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रणिता होडगे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशिष फर्नांडिस, सर यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करून केली.
रोझरी इंग्लिश स्कुलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*
|