बातम्या

रोटरी सेंट्रलचा व्होकेशनल सर्विस अवॉर्ड सोहळा उत्साहात

Rotary Centrals Vocational Service Award Ceremony is abuzz with excitement


By nisha patil - 4/28/2025 1:29:30 PM
Share This News:



रोटरी सेंट्रलचा व्होकेशनल सर्विस अवॉर्ड सोहळा उत्साहात

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी "सचोटीने वागल्यास जग किंमत करते" असे सांगितले. उपजिल्हाधिकारी संपत खिलारी प्रमुख पाहुणे होते.

तेज कुरिअरच्या साधना घाटगे, डॉ. विजय करंडे, श्रीमती मालन सोलप, सागर पोतनीस, वेल्फेअर ऑर्गनायझेशन, बावडा रेस्क्यू फोर्स, गीता हसूरकर, उमेद फाउंडेशन, ड्रीम टीम फाउंडेशन व वसीम सरकवास यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महादेव नरके यांनी केले. अध्यक्ष संजय भगत यांनी वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन पंडित कंदले तर आभार भूमी मोळे यांनी मानले.


रोटरी सेंट्रलचा व्होकेशनल सर्विस अवॉर्ड सोहळा उत्साहात
Total Views: 108