बातम्या
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा स्मशानभूमीस एक लाख शेणीदान संकल्प
By nisha patil - 12/20/2025 4:01:37 PM
Share This News:
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा स्मशानभूमीस एक लाख शेणीदान संकल्प
कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा स्मशानभूमी एक लाख शेणीदान संकल्प करण्यात आला आहे.याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २३ हजार शेणीदानाचा कार्यक्रम आज २० डिसेंबर रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे पार पडला. स्मशानभूमी आरोग्य निरीक्षक श्री सुशांत कांबळे यांनी महापालिकेच्या वतीने शेणी स्वीकारल्या.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने आतापर्यंत अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये विविध हॉस्पिटलला आरोग्य सुविधा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी प्रदान करण्यात आल्या आहेत. आताही सामाजिक जाणीवेतून शेणीदान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने अध्यक्ष रो. राहुल सुभाष कुलकर्णी, सचिव रो. चेतन भोकरे, प्रोजेक्ट चेअरमन आणि क्लब च्या वतीने प्रमुख देणगीदार रो. सचिन मालू, क्लब सर्विस डायरेक्टर रो. सचिन पटेल, वोकेशनल सर्विस डायरेक्टर रो. नवीन उदयपूरिया, प्रेसिडेंट इलेक्ट रो. योगेश रास्ते, व्हाइस प्रेसिडेंट रो. भरत कोटकर, रो. राजीव परीख, रो. दिव्यराज वसा, रो. प्रसन्न देशिंगकर, रो. राहुल कुलकर्णी, रो. सुरेश पंडित उपस्थित होते.
तर शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुपच्या वतीने शुभदा कामत , यशोदा आजरी,शुभांगी चौगुले,स्नेहलता कापसे , प्रदीप महाजन, प्रकाश मुंगुरवाडी, एस ,डी, शिवा,दीपक पोर्लेकर,दिनकर भोईटे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या काही दिवसात शेणींच्या उपलब्धतेनुसार आणि स्मशानभूमीच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख शेणीं दान करण्यात येणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा स्मशानभूमीस एक लाख शेणीदान संकल्प
|