बातम्या

शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात...

Royal Dussehra Festival


By nisha patil - 9/23/2025 11:36:21 AM
Share This News:



कोल्हापूर : शहराच्या परंपरेचा आणि वैभवाचा प्रतीक असलेल्या शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. द्वीप प्रज्वलन करून माननीय जिल्हाधिकारी यांनी महोत्सवाचा शुभारंभ केला व प्रस्ताविक सादर केले.

या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘गाथा शिवशंभूंची’ या भव्य दिव्य नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ऐतिहासिक घटनांचा आढावा घेणारे हे नाटक अतिशय उत्कटतेने सादर करण्यात आले.

कोल्हापुरातील नागरिकांसह परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा आनंद लुटला.


शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात
Total Views: 70