बातम्या
शाही दसरा महोत्सव २०२५ - कोल्हापूरात रंगला करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी - महानाट्याचा प्रयोग-
By nisha patil - 9/25/2025 12:10:16 PM
Share This News:
शाही दसरा महोत्सव २०२५ - कोल्हापूरात रंगला करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी - महानाट्याचा प्रयोग-
कोल्हापूर पोवाडा, जिजाऊ वंदना, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवकार्य आणि राज्याभिषेक, ताराराणी यांची जडण- घडण, लाठी काठी - मर्दानी खेळ, ताराराणी साहेबांनी स्वतः कारभार हाती घेवून हाकलेला राज्य कारभार , छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने केलेली कैद आदी नाट्यमय व रोमांचकारी घटनांचा आज उपस्थित प्रेक्षकांनी करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी या ऐतिहासिक नाट्याद्वारे अनुभव घेतला .
केंद्रशासनच्या सांस्कृतिक संचलनालय , राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शाही दसरा महोत्सव - 2025 अंतर्गत आज तिसऱ्या दिवशी दसरा चौक येथे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते .या महानाट्याने मुगल बादशहा औरंगजेबाला अखेरपर्यंत कसे झुंजविले याचे प्रभावी सादरीकरण केले . त्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला . विशेषत: छत्रपती संभाजीराजांना कैद करून औरंगजेबासमोर उभे करण्यात आले . या वेळी त्या दोघांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक जुगलबंदीने प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले .
महाराणी ताराराणी यांच्या भूमिकेत श्वेता सुतार यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने चार चाँद लावले .यावेळी या नाटकाचे निर्माते चंद्रकांत पाटील व दिग्दर्शक ओंकार रोकडे यांचा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला . तत्पूर्वी पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी कोल्हापूर गादीचा तसेच येथील ऐतिहासिक वास्तूंचे,वैशिष्ठ्यांचे स्लाईड शोद्वारे सादरीकरण व कथन केले .
यावेळी तहसिलदार ( करमणूक ) तेजस्विनी पाटील, निवासी नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, महावीर कॉलेजचे प्राचार्य अद्वैत जोशी, CPR च्या अति .जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सरिता थोरात , कार्य . अभियंता स्मिता माने यांच्यासह अनेक नाट्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शाही दसरा महोत्सव २०२५ - कोल्हापूरात रंगला करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी - महानाट्याचा प्रयोग-
|