बातम्या

शाही दसरा महोत्सव 2025 जिल्हा प्रशासन कोल्हापूर आयोजित

Royal Dussehra Festival 2025 organized by District Administration Kolhapur


By nisha patil - 9/24/2025 3:37:18 PM
Share This News:



शाही दसरा महोत्सव 2025  जिल्हा प्रशासन कोल्हापूर आयोजित 

पारंपरीक वेशभूषा दिन सौ स. म. लोहिया हायस्कुलमध्ये उत्साहाने साजरा झाला. विद्यार्थ्यांनी हस्त कौशल्यातून बनवलेल्या दुर्गा, अंबाबाईची पालखी व घटावरील महालक्ष्मीची प्रतिष्ठापना वेदाभ्यास करणारे विद्यार्थी आदित्य काळे व ऋग्वेद प्रभावळीकर यांनी केली. 

  पूजन व आरती  प्राचार्या श्रीमती एस. बी. पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले व उपप्राचार्या श्रीमती नानिवडेकर, हेडक्लार्क श्रीमती गुरव, श्रीमती जांभलीकर , श्रीमती माने  व श्रीमती अस्वले यांच्या हस्ते धुपारती करण्यात आली. त्यानंतर इ. 5 वी ते 10 च्या सर्व  विद्यार्थ्यांनी सागर बगाडे  यांच्या मार्गदर्शनातून ऐ गिरी नंदिनी या गीतावर सेमी क्लासिकल नृत्याच्या कलापुष्पद्वारा आई जगदंबेच्या चरणी सेवा अर्पण केली. याप्रसंगी प्रशालेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी  हे पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते.
 
आपली संस्कृती, परंपरा जपण्यासाठी अशा उत्सवातून संस्कार करण्याचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले गेले.


शाही दसरा महोत्सव 2025 जिल्हा प्रशासन कोल्हापूर आयोजित
Total Views: 91