बातम्या

शाही दसरा महोत्सवाची धामधूम; पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते आज उद्घाटन

Royal Dussehra Festival in full swing


By nisha patil - 9/22/2025 2:48:43 PM
Share This News:



शाही दसरा महोत्सवाची धामधूम; पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते आज उद्घाटन

'गाथा शिवशंभूंची' महानाट्याने होणार दसरा महोत्सवाची रंगतदार सुरुवात

जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक दसरा चौक येथे सुरू होणाऱ्या शाही दुसरा महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज (२२ सप्टेंबर) सायंकाळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती असतील.

दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कला सादरीकरण, तसेच लोककला महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी दसरा चौकात भव्य आणि आकर्षक स्टेज उभारण्यात आले आहे.

सायंकाळी शिवकालीन क्षेत्र प्रदर्शनाचे उद्घाटन शाहू स्मारक भवन येथे होणार असून, त्यानंतर दसरा महोत्सव उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने ‘गाथा शिवशंभूंची’ हे ऐतिहासिक महानाट्य रंगभूमीवर सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगामुळे महोत्सवाची शोभा आणि उत्साह अधिक वाढणार आहे.

 


शाही दसरा महोत्सवाची धामधूम; पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते आज उद्घाटन
Total Views: 60