बातम्या

जिल्ह्यातील 7 हजार अंगणवाडी सेविकांच्या खात्यात रु. 1 कोटी 49 लाख भाऊबीज जमा

Rs 1 crore 49 lakhs deposited


By nisha patil - 10/16/2025 5:47:06 PM
Share This News:



जिल्ह्यातील 7 हजार अंगणवाडी सेविकांच्या खात्यात रु. 1 कोटी 49 लाख भाऊबीज जमा 

कोल्हापूर, दि. 16  जिल्ह्यातील एकूण 7 हजार 495 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यावर भाऊबीज रक्कम प्रति 2 हजार प्रमाणे रक्कम रु. 1 कोटी 49 लाख 90 हजार जमा करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खती रक्कम वितरित करण्यात आली असल्याची  माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनी केले आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालविकासाच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांचा सन्मान म्हणून शासनाच्यावतीने भाऊबीज भेट स्वरुपात आर्थिक लाभ देण्यात आला आहे. सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट (Direct Benefit Transfer पद्धतीने) जमा करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मनोबल वृद्धिंगत होऊन बालविकास योजनांच्या अंमलबजावणीस अधिक गती  मिळेल, अशी अपेक्षा महिला व बालविकास विभागाने व्यक्त केली आहे.


जिल्ह्यातील 7 हजार अंगणवाडी सेविकांच्या खात्यात रु. 1 कोटी 49 लाख भाऊबीज जमा
Total Views: 53