बातम्या
"दुबई सहलीच्या नावाखाली ७ लाखांची फसवणूक – आरोपी अजून फरार!"
By nisha patil - 8/14/2025 2:38:52 PM
Share This News:
"दुबई सहलीच्या नावाखाली ७ लाखांची फसवणूक – आरोपी अजून फरार!"
कोल्हापूरात दुबई सहलीचे आमिष दाखवून तब्बल सात लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी महीपती पुंडलीक पाटील आणि त्यांच्या परिचितांना आरोपी भाऊराव त्र्यंबक घोलप आणि चंद्रकला जयवंत नेरकर यांनी १७ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत दुबई सहलीसाठी करन्सी आणि सहलीची तिकिटे देण्याचे सांगितले.
फिर्यादी पाटील यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले, पण प्रत्यक्षात फक्त ११०० दिरम म्हणजेच अंदाजे २५ हजार रुपये देण्यात आले. अशाच प्रकारे रवि श्रीनिवाय नायडु, बाबाजी गजानन चाचुर्डे आणि शशिकांत मारुती पाटील यांच्याकडूनही लाखो रुपये घेतले गेले, पण पैसे परत न करता फसवणूक करण्यात आली.
एकूण रक्कम सात लाख दहा हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवला गेला आहे.
महत्वाचे म्हणजे, या प्रकरणातील दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि क्रांती पाटील करत आहेत.
"दुबई सहलीच्या नावाखाली ७ लाखांची फसवणूक – आरोपी अजून फरार!"
|